Skip Navigation LinksHome > मंदिर प्रार्थना > श्री ब्रह्मसंहिता
श्री ब्रह्मसंहिता - संस्कृत श्री ब्रह्मसंहिता - मराठी भाषांतर
ईश्वरः परमः कृष्णः
सच्चिदानन्दविग्रहः ।
अनादिरादिर्गोविन्दः
सर्वकारणकारणम् ||
||
चिन्तामणिप्रकरसद्मसु कल्पवृक्ष
लक्षावृतेषु सुरभीरभिपालयन्तम् ।
लक्ष्मीसहस्रशतसम्भ्रमसेव्यमानं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
वेणुं क्वणन्तमरविन्ददलायताक्षं
बर्हावतंसमसिताम्बुदसुन्दराङ्गम् ।
कन्दर्पकोटिकमनीयविशेषशोभं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
आलोलचन्द्रकलसद्-वनमाल्यवंशी
रत्नांगदं प्रणयकेलिकलाविलासम् ।
श्यामं त्रिभंगललितं नियतप्रकाशं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
अङ्गानियस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति
पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति ।
आनन्दचिन्मयसदुज्वलविग्रहस्य
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
अद्वैतमच्युतमनादिमनन्तरूपं
आद्यं पुराणपुरुषं नवयौवनं च ।
वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभक्तौ
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
पन्थास्तु कोटिशतवत्सरसम्प्रगम्यो
वायोरथापि मनसो मुनिपुंगवानाम्।
सोऽप्यस्ति यत्प्रपदसीम्न्यविचिन्त्यतत्त्वे
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
एकोऽप्यसौ रचयितुं जगदण्डकोटिं-
यच्छक्तिरस्ति जगदण्डचया यदन्तः ।
अण्डान्तरस्थपरमाणुचयान्तरस्थं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
यद्भावभावितधियो मनुजास्तथैव
सम्प्राप्य रूपमहिमासनयानभूषाः ।
सूक्तैर्यमेव निगमप्रथितैः स्तुवन्ति
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
||
आनन्दचिन्मयरसप्रतिभाविताभिस्
ताभिर्य एव निजरूपतया कलाभिः ।
गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतो
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१०
||
प्रेमाञ्जनच्छुरितभक्तिविलोचनेन
सन्तः सदैव हृदयेषु विलोकयन्ति ।
यं श्यामसुन्दरमचिन्त्यगुणस्वरूपं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
११
||
रामादिमूर्तिषु कलानियमेन तिष्ठन्
नानावतारमकरोद् भुवनेषु किन्तु ।
कृष्णः स्वयं समभवत्परम: पुमान् यो
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१२
||
यस्य प्रभा प्रभवतो जगदण्डकोटि-
कोटिष्वशेषवसुधादि विभूतिभिन्नम् ।
तद् ब्रह्म निष्कलमनंतमशेषभूतं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१३
||
माया हि यस्य जगदण्डशतानि सूते
त्रैगुण्यतद्विषयवेदवितायमाना ।
सत्त्वावलम्बिपरसत्त्वं विशुद्धसत्त्वं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१४
||
आनन्दचिन्मयरसात्मतया मन:सु
यः प्राणिनां प्रतिफलन् स्मरतामुपेत्य ।
लीलायितेन भुवनानि जयत्यजस्रं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१५
||
गोलोकनाम्नि निजधाम्नि तले च तस्य
देवीमहेशहरिधामसु तेषु तेषु ।
ते ते प्रभावनिचया विहिताश्च येन
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१६
||
सृष्टिस्थितिप्रलयसाधनशक्तिरेका
छायेव यस्य भुवनानि विभर्ति दुर्गा ।
इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते सा
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१७
||
क्षीरं यथा दधि विकारविशेषयोगात्
सञ्जायते न हि ततः पृथगस्ति हेतोः ।
यः शम्भुतामपि तथा समुपैति कार्याद्
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१८
||
दीपार्चिरेव हि दशान्तरमभ्युपेत्य
दीपायते विवृतहेतुसमानधर्मा ।
यस्तादृगेव हि च विष्णुतया विभाति
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
१९
||
यः कारणार्णवजले भजति स्म योग-
निद्रामनन्तजगदण्डसरोमकूपः ।
आधारशक्तिमवलम्ब्य परां स्वमूर्ति
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२०
||
यस्यैकनिश्वसितकालमथावलम्ब्य
जीवन्ति लोमविलजा जगदण्डनाथा: ।
विष्णुर्महान् स इह यस्य कलाविशेषो
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२१
||
भास्वान् यथाश्मशकलेषु निजेषु तेज:
स्वीयं कियत्प्रकटयत्यपि तद्वदत्र ।
ब्रह्मा य एष जगदण्डविधानकर्ता
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२२
||
यत्पादपल्लवयुगं विनिधाय कुम्भ
द्वन्द्वे प्रणामसमये स गणाधिराजः ।
विघ्नान् विहन्तुमलमस्य जगत्रयस्य
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२३
||
अग्निर्मही गगनमम्बु मरुद्दिशश्च
कालस्तथात्ममनसीति जगत्त्रयाणि ।
यस्माद् भवन्ति विभवन्ति विशन्ति यं च
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२४
||
यच्चक्षुरेष सविता सकलग्रहाणां
राजा समस्तसुरमूर्तिरशेषतेजाः ।
यस्याज्ञया भ्रमति सम्भृतकालचक्रो
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२५
||
धर्मोऽथ पापनिचयः श्रुतयस्तपांसि
ब्रह्मादिकीटपतगावधयश्च जीवाः ।
यद्दत्तमात्रविभवप्रकटप्रभावा
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२६
||
यस्त्विन्द्रगोपमथवेन्द्रमहो स्वकर्म-
बन्धानुरूपफलभाजनमातनोती ।
कर्माणि निर्दहति किन्तु च भक्तिभाजां
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२७
|| यं क्रोधकामसहजप्रणयादिभीति
वात्सल्यमोहगुरुगौरवसेव्यभावैः ।
सञ्चिन्त्य तस्य सदृशीं तनुमापुरेते
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ||
२८
||
श्रियः कान्ताः कान्तः परमपुरुष: कल्पतरवो
द्रुमा भूमिश्चिन्तामणिगणमयी तोयममृतम् ।
कथा गानं नाट्यं गमनमपि वंशी प्रियसखी
चिदानन्दं ज्योतिः परमपि तदास्वद्यमपि च ॥
स यत्र क्षीराब्धिः स्रवति सुरभीभ्यश्च सुमहान्
निमेषार्धाख्यो वा व्रजति न हि यत्रापि समयः ।
भजे श्वेतद्वीपं तमहमिह गोलोकमिति यं
विदन्तस्ते सन्तः क्षितिविरलचाराः कतिपये ||
२९
||
श्री ब्रह्मसंहिता - मराठी भाषांतर

श्रीकृष्ण जे गोविंद या नावाने संबोधले जातात, ते सर्वोच्च परमेश्वर आहेत, त्यांचे शरीर सच्चिदानंद अर्थात, शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. ते सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत, त्यांचा कोणी उगम नाही, ते सर्व कारणाचे आदिकारण आहेत.

मी, आदिपुरुष श्रीगोविंद यांचे पूजन करतो, जे लक्षावधी कल्पवृक्षांनी वेढलेल्या, चिंतामणी धामात सुरभी अर्थात, कामधेनू स्वरूप अनंत गायींचे स्नेहपूर्वक पालन करीत आहेत. लक्ष्मी-स्वरूप सहस्रावधी गोपींद्वारे प्रेमाने आणि आदराने ते सेवित आहेत.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो, जे आपले नित्य धाम वृंदावनात निरंतर वेणू वाजवितात, ज्यांचे नेत्र कमलदलासमान विशाल आहेत, ते मोरमुकुट धारण करतात, त्यांचा श्रीविग्रह श्याममेघासमान मनोहर असून ते कोटी कामदेवांहून अधिक सुंदर आहे.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो, ज्यांच्या मस्तकावर मोरमुकुट विराजमान आहे, गळ्यात वनमाला, ओठांवर बांसरी, भुजांमध्ये रत्नजडित बाजूबंद शोभायमान आहेत, ज्यांचा विलास स्नेहपूर्ण परिहास कलेने युक्त आहे, त्यांचे श्यामस्वरूप त्रिभंगललित, एकरस राहणाऱ्या प्रकाशाने युक्त आहे.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, ज्यांचा श्रीविग्रह पूर्णपणे आनंदमय, उज्वल, सत्य, ज्ञानमय आहे. अशा त्या अलौकिक दिव्य शरीराचे प्रत्येक अवयव इतर अवयवांच्या वृत्तीने युक्त असून कोणतेही कार्य करण्यास समर्थ आहेत आणि ते अगणित अशा भौतिक आणिआध्यात्मिक ब्रह्मांडाची (विश्वांची) निर्मिती, पालन आणि ते नियमन करतात.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, ज्यांना वेदांद्वारे जाणणे दुर्लभ आहे; परंतु आत्म्याच्या शुद्ध निर्मळ भक्तीद्वारे ते प्राप्त होऊ शकतात, जे अद्वितीय, अच्युत (ज्यांचे कधीच पतन होत नाही) आणि अनादी (आरंभरहित) आहेत, ज्यांची अनंत रूपे आहेत, जे आद्य, पुराणपुरुष असूनही चिरतरुण आहेत.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो की, जे कोट्यवधी वर्षांच्या प्रयत्नाने वायू तसेच प्रमुख मुनिजनांच्या मनाला सुद्धा अगम्य असा मार्ग, अचिंत्य प्रभावाच्या त्यांच्या व चरणकमलांच्या अग्रभागापर्यंत पोहोचतो. त्याच्या प्राप्तीसाठी योगीजन प्राणायामाद्वारे किंवा ज्ञानीजन भौतिक तत्त्वविरहित अद्वैत ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न अनंतकाळापासून करीत असतात. श्रीगोविंदांचे तत्त्व अचिंत्य आहे. ते तर्काने जाणणे शक्य नाही.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, ज्याप्रमाणे शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नाही, त्याचप्रमाणे ते (श्रीगोविंद) अविभाज्य तत्त्व आहेत. त्यांनी निर्मिलेल्या • कोट्यवधी ब्रह्मांडांमध्ये सुद्धा त्यांची शक्ती अविभाज्य राहते. एकाचवेळी सर्व ब्रह्मांडे त्यांच्यात अस्तित्वात आहेत आणि ते पूर्ण ब्रह्मांडात विस्तृत झालेल्या प्रत्येक परमाणूमध्ये पूर्णतया व्यापून आहेत.

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो, भावभावित द्वारे बुद्धिमान भावुक मनुष्यगण, त्यांच्या कृपेने त्यांच्या समान महिमा, आसन, यान तसेच वस्त्रभूषणे इत्यादी प्राप्त करून, भावविभोर होऊन वेदप्रसिद्ध पुरुष-सूक्त मंत्राने त्यांची स्तुती करतात.
१०

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना वंदन करतो की, जे स्वत:च्या गोलोक धामामध्ये श्रीमती राधाराणींसह निवास करतात. चौसष्ट कलागुणांनी युक्त श्रीमती राधाराणी ही त्यांची आध्यात्मिक भावयुक्त मूर्तिमंत ह्रादिनीशक्ती आहे. तिच्या समवेत, तिच्या विस्ताररूप असलेल्या विश्वासू सेविका (सखी) देखील श्रीगोविंदांच्या नित्य दिव्यरसाने भारित गोलोकधामामध्ये निवास करतात.
११

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांची आराधना करतो की, जे स्वतः श्यामसुंदर श्रीकृष्ण आहेत, जे अचिंत्य गुणांनी युक्त आहेत, ज्यांना शुद्ध भक्त, प्रेमांजनयुक्त, भक्तीरूप नेत्रांनी आपल्या हृदयात सदैव पाहात असतात.
१२

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना वंदन करतो की, जे स्वतः परम पुरुष श्रीकृष्ण आपल्या कलाविस्ताराच्या नियमाने श्रीराम, नृसिंह, वामन इत्यादी रूपांमध्ये भूतलावर अवतार धारण करतात.
१३

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, जे कोटी कोटी ब्रह्मांडात पृथ्वी, आदी समस्त विभूतींपासून भिन्न, अखंड, अनंत तसेच निखिल ब्रह्म आहेत. ब्रह्मदेखील अनेक अवतार घेणाऱ्या परम प्रभावशाली श्रीगोविंदांचे दिव्य तेज असून अनंत अशा भौतिक विश्वापासून निराळे आहे आणि याच कारणाने ते अविभाज्य अनंत सत्य असल्याची जाणीव होते.
१४

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, जे परम सत्य आहेत आणि सर्व अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंचा आधार आहेत. ज्यांची बहिरंगाशक्ती माया, सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त आहे आणि ती या भौतिक जगाबद्दलचे ज्ञान वेदांच्या द्वारा प्रसारित करते.
१५

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो, ते आपले स्मरण करणाऱ्या शुद्ध भक्तांच्या मनात उपस्थित होऊन, आनंद चिन्मयरस स्वरूपाने प्रतिफलित होतात. त्यांची यशोगाथा त्यांच्या लीलाविलासांद्वारे अनेक भुवनातून निरंतर विस्तारित होत असते.
१६

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, त्यांनी आपल्या गोलोक वृंदावन धामाखालोखाल वैकुंठधाम (हरीचे धाम), शिवधाम (महेशाचे निवास), देवी धाम (भौतिक जगत) विस्तारित केले आहे. तसेच प्रत्येक धामात एक एक अधिकारी नियुक्त केला आहे.
१७

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, कारण बहिरंगा शक्ती 'माया' ही 'चित' शक्तीच्या छायेप्रमाणे आहे. तिचे 'दुर्गा' रूप सर्व लोकांमध्ये पूजिले जाते. ती या भौतिक जगाची उत्पत्ती, रक्षण तसेच संहाराची प्रमुख आहे. तरीही हे सर्व कार्य ती भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार करते.
१८

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना पूजितो, ज्याप्रकारे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये आम्लाच्या प्रक्रियेने होते; परंतु दही हे दुधासमान नाही. तरीही त्याच्या निर्मितीच्या कारणापासून म्हणजेच दुधापासून निराळेही नाही. त्याचप्रकारे श्रीगोविंद हे प्रलयाचे कार्य करण्यासाठी 'शम्भूरूप' (भगवान शंकररूप) धारण करतात.
१९

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, एका दिव्यापासून दुसरा दिवा पेटवला की, तो स्वतंत्रपणे ज्याप्रकारे जळत असला तरी त्यांच्या प्रकाशाचे गुणधर्म समानच असतात. त्याप्रकारे श्रीगोविंद, श्रीविष्णू म्हणून स्वत:ला अनेक रूपात प्रकाशित करतात.
२०

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, ज्यांनी स्वत:चेच महाकाय रूप विस्तारित केले आहे. ज्यांनी आपल्या रोमकूपांमध्ये अनंत ब्रह्मांडे धारण केली असून, ते आधार शक्तिरूप शेष देखील आहेत. त्यांच्याकडे सर्वव्यापी शक्ती पुरेपूर प्रमाणात आहेत, तसेच ते कारणोदक समुद्रात योगनिद्रा सेवन करीत आहेत.
२१

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो, महाविष्णूंच्या रोमकुपातून या भौतिक जगाचे ब्रह्मदेव तसेच अन्य देवता येतात आणि ते महाविष्णू श्वास घेईपर्यंत जीवित राहतात. हे महाविष्णू श्रीगोविंदांच्या विस्तारित रूपाचे विस्तारित रूप (कलाविशेषरूप) आहे.
२२

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना पूजितो की, ज्याप्रमाणे सूर्य स्वत:च्या प्रकाशाचा काही भाग सूर्यकांत नामक तेज:पुंज मण्यात प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे भगवान श्रीगोविंद, ब्रह्मदेव बनून भौतिक जगाचे नियमन करण्याचे कार्य करतात
२३

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो की, ज्यांचे चरणकमल गणाधिराजाने (गणपतीने) आपल्या मस्तकाच्या दोन्ही कुंभावर धारण केले आहे. तिन्ही जगाच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी गणेशाने श्रीगोविंदांचे चरण धारण केले आहे.
२४

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना नमन करतो, कारण अग्नी, पृथ्वी, आकाश, जल, वायू, दिशा, काल, आत्मा आणि मन या नऊ तत्त्वांनी तिन्ही लोकांची निर्मिती झाली असून हे तीन लोक श्रीगोविंदांपासून उत्पन्न होतात. त्यांच्यापासून अस्तित्वात राहतात आणि त्यांच्यातच प्रलयकाळी विलीन होतात.
२५

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव जो अनंत दिव्य तेजाने युक्त आहे, तो सुद्धा श्रीगोविंदांचा नेत्रस्वरूप आहे. त्यांच्या आज्ञेनेच सूर्य कालचक्र धारण करून भ्रमण करीत असतो.
२६

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, ज्यांनी दिलेल्य शक्तीद्वारे अस्तित्वात असणाऱ्या सर्वप्रकारच्या शक्ती पुण्यकर्म, पापकर्म समूह, वेद, श्रुतिशास्त्रोक्त धर्म, सर्व ता तसेच ब्रह्मदेव ते क्षुद्र कीटकांपर्यंत सर्व जीव आपले वैभ प्रभावित करतात आणि अस्तित्वात राहतात.
२७

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, जे इंद्रगोप नामक कीटकापासून ते देवराज इंद्रांपर्यंत, जे कोणी कर्मानुसार कार्य करतात, त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार नि:पक्षपातीपणे कर्मफळे प्रदान करतात, तसेच जे भक्तीने प्रेरित आहेत त्यांची सर्व प्रकाराची कर्मफळे मूळापासून नष्ट करतात.
२८

मी, आदिपुरुष श्रीगोविंदांना भजतो की, जे लोक क्रोध, काम, भय, वात्सल्य, मोह, प्रेम, गुरूसमान गौरव आणि ऐच्छिक सेवाभाव याद्वारे श्रीगोविंदांचे स्मरण करतात, त्या भावनेनुसार त्यांना तशी शरीरे प्राप्त होतात.
२९

मी, अलौकिक श्वेतद्वीप गोलोक धामाला वंदन करतो की, जेथे प्रिय सखी रूपात अनेक लक्ष्मी, भगवान श्रीकृष्णांची त्यांचा प्रियकर या नात्याने अहैतुकी आध्यात्मिक भावात सेवा करीत असतात. तेथे प्रत्येक वृक्ष कल्पतरू आहे. तेथील भूमी चिंतामणींनी व्यापलेली आहे. पाणी अमृततुल्य आहे. प्रत्येक शब्द गीत आहे. प्रत्येक चाल नृत्याप्रमाणे आहे. तेथे बांसरी ही नित्य सहचारीणी प्रमाणे आहे. तेथील प्रकाश दिव्य आनंदमयी आहे. अत्युच्य आध्यात्मिक तत्त्वे आस्वादपूर्ण आहेत. तेथील असंख्य सुरभी गायी नित्य दुधाच्या अलौकिक सागरांची निर्मिती करीत असतात. तेथे दिव्य काल नित्य उपस्थित असतो, तो भूत, वर्तमान, भविष्यरहित आहे आणि तो अर्ध्या क्षणासाठी सुद्धा कुठेच जात नाही. अशा स्थानाला गोलोक वृंदावन म्हटले असून ते या भौतिक जगातील थोड्याच आत्मसाक्षात्कारी जीवांना ज्ञात आहे.



Visit Count #
20,03,611
© ISKCON Ravet | All Rights Reserved | SW Version 2.2