भगवन्नामा-प्रती होणारे 10 नाम अपराध - श्री पद्म पुराण निर्देशित - चैतन्य चरितामृत -आदि ८.२४ मध्ये दिल्याप्रमाणे
In English
श्री पद्म पुराण सांगते:

पहिला नाम अपराध:
सतां निंदा नाम्नः परमं अपराधं वितनुते |

यतः ख्यातिं यातं कथं उ सहते तद्विगर्हाम् ||


हरे कृष्ण महा मंत्राचा महिमा प्रचार करणाऱ्या थोर संतांची निंदा करणे हा पवित्र नामाच्या चरणकमळाचा सर्वात नीच स्तराचा अपराध आहे. हरे कृष्ण महामंत्राचा महिमा प्रकट करणार्‍या प्रचारकावर टीका करू नये. जर कोणी असे केले तर तो अपराधी आहे. नाम-प्रभू, जे कृष्णाशी एकरूप आहेत, अगदी महान भक्त म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीकडून देखिल अशी निंदनीय कृत्ये कधीही सहन करणार नाहीत.

दुसरा नाम अपराध:
शिवस्य श्रीविष्णोः य इह गुणनामादिसकलं |

धिया भिन्नं पश्येत स खलु हरिनामाहितकरः ||


या भौतिक जगात, विष्णूंचे पवित्र नाव सर्व-मंगलदायी आहे. विष्णूंचे नाव, रूप, गुण आणि लीला हे सर्व दिव्य, परिपूर्ण ज्ञान आहे. म्हणून, जर कोणी भगवंताच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पवित्र नामापासून किंवा त्यांच्या दिव्य रूप, गुण आणि लीलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भौतिक समजले तर तो अपराध आहे. त्याचप्रमाणे, भगवान शिवांसारख्या देवतांची नावे भगवान विष्णूंच्या नावाच्या स्तरावर आहेत असा विचार करणे - किंवा दुसर्‍या शब्दात, असे समजणे की भगवान शिव आणि इतर देवीदेवत ही भगवंताची इतर रूपे आहेत आणि म्हणून विष्णूंच्या समान आहेत - असे मानणे अपराध आहे. भगवंतांच्या पवित्र नामाच्या चरणकमळाशी हा दुसरा अपराध आहे.

तिसरा नाम अपराध:
गुरोरवज्ञा |

अध्यात्मिक गुरुला भौतिक समजणे आणि म्हणून त्यांच्या उच्च स्थानाचा मत्सर करणे.

चौथा नाम अपराध:
श्रुतिशास्त्रनिंदनं |

चार वेद आणि पुराण यांसारख्या वैदिक साहित्याची निंदा करणे.

पाचवा नाम अपराध:
तदर्थवादः |

पवित्र नामाचा महिमा केवळ एक अतिशयोक्ती आहे असे समजणे.

सहावा नाम अपराध:
हरिनाम्नि कल्पनं |

परमेश्वराच्या पवित्र नामाचा महिमा केवळ काल्पनिक आहे असे समजणे.

सातवा नाम अपराध:
नाम्नो बलाद यस्य हि पापबुद्धिः |

न विद्यते तस्य यमैर्हि शुद्धिः ||


हरे कृष्ण मंत्र सर्व पापमय प्रतिक्रियांचा प्रतिकार करू शकतो असा विचार करून, एखादी व्यक्ती आपल्या पापी कृत्यांना करत राहते आणि त्याच वेळी त्यांना निष्फळ करण्यासाठी हरे कृष्ण मंत्राचा जप करते हा हरिनामाच्या चरणकमळाचा सर्वात मोठा अपराध आहे.

आठवा नाम अपराध:
धर्मव्रतत्यागहुतादिसर्वं- |

शुभक्रियासाम्यं अपि प्रमादः ||


हरे कृष्ण मंत्राचा जप हा धार्मिक कर्मकांड विधी मानणे अपराध आहे. धार्मिक विधी करणे, व्रतांचे पालन करणे आणि वैराग्य आणि त्यागाचे आचरण करणे ही सर्व भौतिकवादी शुभ कार्ये आहेत. हरे कृष्ण महा-मंत्राच्या जपाची तुलना अशा भौतिकवादी धार्मिकतेशी करता कामा नये. परमेश्वराच्या पवित्र नामाच्या चरणकमळाशी हा अपराध आहे.

नववा नाम अपराध:
अश्रद्धधाने विमुखेऽपि अश्रुण्वति |

यश्चोपदेशः शिवनामापराधः ||


ज्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही किंवा या विषयावर श्रद्धा नाही अशा लोकांमध्ये पवित्र नामाचा महिमा सांगणे हा अपराध आहे. अशा लोकांना हरे कृष्ण मंत्राचा जप ऐकण्याची संधी दिली पाहिजे, परंतु सुरुवातीला त्यांना पवित्र नामाच्या महिमा किंवा आध्यात्मिक महत्त्वाबद्दल प्रचार करू नये. पवित्र नामाचे सतत श्रवण केल्याने त्यांचे अंतःकरण शुद्ध होईल आणि मग ते पवित्र नामाचे दिव्य स्थान समजण्यास सक्षम होतील.

दहावा नाम अपराध:
श्रुतेऽपि नाममहात्म्ये यः प्रीतिरहितो नरः |

अहंममादिपरमो नाम्नि सोऽपि अपराधकृत ||
१०

जर एखाद्याने परमेश्वराच्या दिव्य पवित्र नामाचा महिमा ऐकला असेल, परंतु तरीही जीवनाच्या भौतिकवादी संकल्पनेत राहून, "मी हे शरीर आहे आणि या शरीरासंबधित सर्व काही माझे आहे [अहं ममेति]" असा विचार करत असेल, आणि हरे कृष्ण महामंत्राच्या जपावर प्रेम व योग्य आदर करित नसेल, तर तो अपराध आहे.

टिप: अपि प्रमाद: ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक अपराध आहे.


Visit Count #
20,03,537
© ISKCON Ravet | All Rights Reserved | SW Version 2.2